नशेबाजांत संचारलेल्या पशुत्त्वासमोर तिचा निभाव लागला नाही, अन् निर्भयाकांड घडले .
कर्जत तालुक्यातील कोपर्डीतील निर्भयाकांडाने राज्य हादरले. याप्रकरणी तिघांना आज फाशीची शिक्षा जाहीर झाली. त्यातील शिंदे हा ह्या प्रकरणातील मुख्य आरोपी, गावातील मित्रांसमवेत हौसमजा करणारा युवक. त्याची दोन लग्ने झालेली , एक पत्नी त्याच्यापेक्षाही वयाने मोठी असून दोन बायकांच्या या स्त्री लंपट पुरुषाने महिलांची यापूर्वी छेडछाड केल्याची प्रकरणे समोर आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील भिगवण व श्रीगोंदा तालुक्यात त्याने महिलांची छेडछाड केली होती. त्या छेडछाडीची कोपर्डी परिसरात चांगलीच चर्चा झाली होती . परंतु, त्या महिलांनी पोलिस ठाण्यात जाणे टाळले होते.छेडछाड करूनही महिलांनी पोलिस ठाण्यात जाणे टाळले. त्यामुळे शिंदे याचे धाडस वाढत गेले.
त्या दिवशी शिंदे त्याचा मित्र संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांच्यासोबत दारू पीत बसला होता. अत्याचार झाल्याच्या घटनास्थळपासून एक किलोमीटर अंतरावर दारू प्यायल्यानंतर तो पुन्हा घटनास्थळापासून 50 फूटावर दारू पिण्यास बसला. आजोबांकडे आलेली श्रद्धा पुन्हा सायकलहून जाताना नराधम शिंदेची तिच्यावर नजर गेली. जोडीदारासोबत त्याने तिचा पाठलाग केला.
रात्री साडेसात वाजण्याची वेळ असताना आजोबांपासून काही मीटर अंतरावर गेल्यानंतर या श्वापदांनी तिला रस्त्याच्या बाजूला ओढून नेले. कबड्डीची खेळाडू असलेल्या या निर्भयाने नशेबाजांना कडाडून विरोध केला. परंतु, नशेबाजांत संचारलेल्या पशुत्त्वासमोर तिचा निभाव लागला नाही अन् निर्भयाकांड घडले.