Breaking News

आरोपींना फाशी मिळाली तरी माझी छकुली परत येणार नाही ....

माझ्या छकुलीला न्याय मिळाला, पण आरोपींना फाशी मिळाली तरी माझी छकुली परत येणार नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने व्यक्त केली. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. 


खून आणि बलात्काराच्या शिक्षेखाली तिघांनाही जन्मठेप आणि फाशीची शिक्षा झाल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. कोपर्डीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेला बलात्कार आणि हत्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच दुसरा आणि तिसरा आरोपी संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना विविध कलमांखाली जन्मठेप आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आली 
आहे.