Breaking News

‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली !


मुंबई, दि. 20, नोव्हेंबर - ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 1 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, आता प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडली आहे. हा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला आहे. मात्र, प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
आपण स्वेच्छेने चित्रपट प्रदर्शन लांबणीवर टाकत असल्याचे व्हायाकॉम-18 मोशन्स पिक्चर्सच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. सीबीएफसीकडून अजूनही पद्मावती चित्रपटाला प्रमाणपत्र मिळाले नाही. सीबीएफसीबद्दल आपल्याला आदर असल्याचे सांगत लवकरच सिनेमाला हिरवा कंदील मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.