पुणे मेट्रो बाबतची एनजीटीची अंतिम सुनावणी 5 डिसेंबरला
पुणे, दि. 16, नोव्हेंबर - पुणे मेट्रोचा मार्ग नदीपात्रामधून जात असल्याने या मार्गाला शहरातील पर्यावरण प्रेमींनी विरोध केला असून याच्या विरोधात एनजीटीमध्ये (राष्ट्रीय हरित न्यायालय) याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. आजच्या सुनावणीमध्ये पुणे मेट्रोसाठी नेमण्यात आलेल्या तज्ञ समितीचा अहवाल ’एनजीटी’कडे सादर करण्याचे निर्देश देत या बाबतची अंतिम सुनावणी 5 डिसेंबरला होणार असल्याचे सांगितले.
शहरातील बहुचर्चित मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गांचा समावेश आहे. त्यातील वनाझ ते रामवाडी या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. हा मार्ग जंगली महाराज रस्ता , संचेती चौक, सिव्हिल कोर्ट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्ग पुणे स्थानकाला जाण्याऐवजी खंडुजीबाबा चौक मार्गाने नदीपात्रातून पालिका भवन, धान्यगोदाम, संगम ब्रिजमार्गे पुणे स्टेशन असे जाणार आहे. त्यातील खंडुजीबाबा चौक ते सिव्हिल कोर्टपर्यंतच्या पावणेदोन किलोमीटरच्या मार्गाला स्थगिती द्यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी ‘एनजीटी’मध्ये केली आहे
या प्रकल्पाच्या विरोधात उद्योगपती अनु आगा, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, आरती किर्लोस्कर आणि सारंग यादवाडकर यांनी एनजीटीमध्ये याचिका दाखल केली. आजच्या सुनावणीमध्ये मागील सुनावणी दरम्यान ’एनजीटी’तर्फे महा मेट्रोच्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्यासाठी तज्ञांची समिती नेमण्याची शिफारस करण्यात आली होती. त्याचा अहवाल लवकरात लवकर ठेवण्याचे आदेश मेट्रोला देण्यात आले.
तसेच तज्ज्ञ समितीने अद्याप आपला अहवाल सादर केलेला नाही.

या समितीत बदल करण्यात यावा अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात करण्यात आली. महा मेट्रोच्या वतीने उपस्थित राहून ऍड. प्रल्हाद परांजपे यांनी त्यास विरोध दर्शविला. त्यानंतर तज्ञ समितीने ’एनजीटी’कडे आपला अहवाल सादर करावा, असे निर्देश देत अंतिम सुनावणी 5 डिसेंबरला होणार असल्याचे सांगितले.