लोककला हे प्रबोधन व लोकजागृतीचे प्रभावी माध्यम - महापौर सुरेखा कदम
अहमदनगर, दि. 16, नोव्हेंबर - प्रबोधन व लोकजागृतीचे प्रभावी माध्यम लोककला आहेत.हा आपल्या सामाजिक संस्कृतीचा वारसा असून ही संस्कृती टिकविण्यासाठी लोकक लेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे,असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले.
पंडित जवाहरलाल नेहरु व वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त नेहरु युवा केंद्र,जिल्हा समाजकल्याण कार्यालय,जिल्हा क्रीडा कार्यालय,रयत प्रतिष्ठान व जय स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय लोककला महोत्सवाचे उद्घाटन महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते झाले.यावेळी त्या बोलत होत्या.
बाळासाहेब बोराटे यांनी लोप पावत चाललेल्या कला जीवंत ठेवण्याचे कार्य आजच्या युवकांना करायचे आहे. महाराष्ट्रातील लोककला आपल्या संस्कृतीशी निगडीत असून त्यांना प्रोत्साहन देण्याची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. भगवान फुलसौंदर म्हणाले की, प्राचीन काळात सर्वप्रथम भाषेचा शोध लागला.

भाषेद्वारे विचारांची देवाण घेवाण होवू लागली.मात्र जीवनात मनोरंजनाचे काम लोककलेने केले.या लोककलेच्या माध्यमातून सामाजिक जनजागरणाचे काम झाले.नंतर या लोक कलावंताना राजाश्रय मिळाला.सध्या लोक कलेला राजाश्रय नसल्याने ते लोप पावत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.टिळक रोड येथील माऊली सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या लोककला महोत्सवात भारुड,जागरण गोंधळाचा कार्यक्रम रंगला होता.