Breaking News

ट्विटरकडून अक्षर मर्यादेत दुपटीने वाढ

मुंबई, दि. 09, नोव्हेंबर - ट्विटरने 140 अक्षरांच्या मर्यादेत वाढ करुन ती आता 280 इतकी केली आहे. त्यामुळे आता ट्वीट करायचे असेल तर मोकळ्या हाताने करता येणे शक्य  होणार आहे. मात्र चायनिज, जॅपनिज आणि कोरियन भाषेसाठी अक्षर मर्यादा तेवढीच ठेवण्यात आली आहे. 
ब-याचदा ट्विट्स हे इंग्रजी माध्यमातून केले जातात. त्यामुळे 140 ची अक्षरमर्यादा असल्यामुळे कमी लिहावे लागते. तसेच अधिक वेळ ट्विट एडिट करण्यातच जातो, असे ट्विटरकडून  सांगण्यात आले आहे. मराठी भाषेत काना, मात्रा जास्त असल्याने ट्वीट करण्यासाठीही वाढीव अक्षर मर्यादेचा फायदा होणार आहे.