रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराचे बाबा पार्सेकर, निर्मला गोगटे पुरस्काराचे मानकरी; 20 नोव्हेंबरला वितरण
मुंबई, दि. 19, नोव्हेंबर - ज्येष्ठ नेपथ्यकार श्री. बाबा पार्सेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री गायिका श्रीमती निर्मला गोगटे यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार येत्या दि. 20 नोव्हेंबर रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर येथे आयोजित सोहळयात प्रदान करण्यात येणार आहे.
श्री. बाबा पार्सेकर यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार व श्रीमती निर्मला गोगटे यांना संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्क ाराने गौरविण्यात येणार आहे. मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि रु.5 लाख असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे.

सोमवार दि. 20 नोव्हेंबर रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरीवली, मुंबई येथे सायंकाळी 7.30 वाजता आयोजित एका विशेष सांस्कृतिक सोहळयात यापूर्वीचे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ रंगकर्मी श्री. लीलाधर कांबळी व श्रीमती रजनी जोशी यांच्या हस्ते हे दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे, महापौर श्री. विश्वनाथ महाडेश्वर, खासदार श्री. गोपाळ शेट्टी, आमदार प्रविण दरेकर आणि आमदार श्रीमती मनीषा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या पुरस्कार सोहळयाच्या निमित्ताने दोन्ही पुरस्कारार्थींच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा रंगवेध ! हा कार्यक्रम प्रथितयश कलावंत सादर करणार आहेत. डॉ. गिरीश ओक, सुमुखी पें डसे, स्मिता तांबे, सीमा देशमुख, शुभा गोडबोले, मेधा गोगटे जोगळेकर, राहुल मेहेंदळे, समीर दळवी, मकरंद पाध्ये, ऋचा पाध्ये, भक्ती रत्नपारखी आणि अरविंद पिळगांवकर हे कलाकार नाट्यगीते व नाट्यप्रवेश सादर करतील.
या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन श्रीनिवास नार्वेकर यांचे आहे. तसेच संगीत मार्गदर्शक म्हणून कौशल इनामदार असून साथसंगत मकरंद कुंडले, धनंजय पुराणिक, अमित पाध्ये आणि रक्षानंद पांचाळ करणार आहेत.
हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.
हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.