Breaking News

घराचे कुलूप तोडून 20 तोळे सोन्यासह चारचाकी गाडी लंपास

सातारा, दि. 17, नोव्हेंबर - लोणंद येथील गावर चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून 20 तोळे सोन्यासह चारचाकी गाडी लंपास केली आहे. भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे लोणंद परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.


जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका असलेल्या मृणाल जाधव या गोटे माळावरील माने यांच्या ज्ञानेश्‍वरी या इमारतीमध्ये भाड्याने राहतात. त्यांचे पती पाटण तालुक्यात प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. मृणाल जाधव या घराला कुलुप लावून शाळेत गेल्या होत्या. 

यावेळेतच चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून कपाटातील सुमारे 20 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. चारचाकी होंडा अमेज गाडी (क्र.एमएच 09-इजी -0340) लंपास केली. दरम्यान, याबाबत जाधव यांनी लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.