Breaking News

कल्याणची टिना जैन-चौधरी ‘मिसेस इंडिया होममेकर 2018’ ची मानकरी

ठाणे, दि. 20, नोव्हेंबर - कल्याणमधील टिना जैन-चौधरीने दिल्ली-गुडगाव इथे झालेल्या मिसेस इंडिया होममेकर 2018 या सौंदर्यस्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आयझा नाझ-जोशी तर्फे आयोजित या सौंदर्यस्पर्धेत टिनाने ‘एमएस’ (ची) विभागात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. तसेच, आपल्या संभाषण कौशल्याच्या बळावर तिने या स्पर्धेतील ‘बेस्ट इंटरव्ह्यूअर’चा बहुमानही मिळवला आहे.


मिसेस, क्लासिक आणि एमएस (ची) अशा तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात कल्याणात इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करणार्‍या टिना जैन-चौधरीसह देशातील 40 सा ैंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील विजयामुळे पुढील वर्षी जून महिन्यात होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये टिना भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. टिनाने कल्याणमधील मराठी माध्यमाच्या सुभेदार वाडा शाळेतून आपले दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले असून इंजिनिअरींगमधील बी.ई.कंप्यूटर पदवीही प्राप्त केली आहे.