Breaking News

रेस्टॉरंट संघाकडून जीएसटीच्या नवीन दराबाबत समाधान व्यक्त

जीएसटीमध्ये हॉटेल व रेस्टॉरंटवरील कर स्तर कमी केल्याने पूर्व भारत हॉटेल व रेस्टॉरंट संघाने स्वागत केले आहे. तसेच इनपुट टॅक्स क्रेडिट शिवाय ५ टक्के जीएसटी दर ठेवल्यानेही काहीसा दिलासा मिळाला असल्याचे संघाने म्हटले आहे.


वास्तविक इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नसल्याने अनेक रेस्टॉरंट मालकांनी वस्तूंचे दर कमी करणे काही शक्य होईल, असे वाटत नसल्याचे सांगत दरवाढीचेही संकेत दिले आहेत. मात्र, पूर्व भारत हॉटेल व रेस्टॉरंट संघाने नवीन दराबाबत समाधान व्यक्त केले आहे. संघाचे अध्यक्ष सुदेश पोद्दार यांनी एका पत्रकात समाधान व्यक्त केले आहे.

रेस्टॉरंट इनपुट टॅक्सचा फायदा ग्राहकांना देत नसल्याचे जीएसटी परिषदेचे म्हणणे असून त्यामुळे इनपुट टॅक्स क्रेडिट परत घेण्यात आले. मात्र, या निर्णयाबद्दल रेस्टॉरंट मालकांकडून टीका केली जात आहे.इनपुट टॅक्स क्रेडिट देण्यात येणार नसल्याने अनेक नाराज रेस्टॉरंट मालकांनी आपल्या वस्तूंच्या किमतीमध्ये १० टक्के वाढ करण्याचाही विचार करत असल्याचे वृत्त आहे.तसे झाले, तर ग्राहकांना जीएसटी दरात कपात केल्याचा काही एक फायदा मिळणार नाही. 

मात्र, जोपर्यंत रेस्टॉरंट मालक आपल्या वस्तूंच्या दरात वाढ करत नाहीत, तोपर्यंत अप्रत्यक्षरीतीने ग्राहकांना परिषदेच्या निर्णयाचा फायदा होणार आहे.२८ वरून १८ टक्के करदरही काही वस्तूंना करण्यात आले आहेत. हे नवीन टॅक्स दर हे १५ नोव्हेंबरपासून अमलात येणार आहेत. या निर्णयामुळे सरकारला सुमारे २० हजार कोटी रुपयांचा तोटा होणार आहे.