पुढील वर्षात नोकरदारांच्या पगारात 10 टक्क्यांची वाढ !
मुंबई, दि. 11, नोव्हेंबर - देशातील खासगी क्षेत्रातल्या कर्मचार्यांचा पगार पुढील वर्षापर्यंत 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचे ‘सॅलरी बजेट प्लॅनिंग’ यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्व्हेक्षणासाठी जुलै महिन्यात आशियाई पॅसिफिक क्षेत्रातील 4 हजार प्रतिनिधींची मते विचारात घेण्यात आली. यात 300 भारतीय कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे गेल्या वर्षी हजारो कर्मचार्यांना पगारवाढ मिळाली नसून यंदा 10 टक्के सरासरी पगारवाढ असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये बीपीओ, केमिकल्स, बांधकाम क्षेत्र आणि अभियांत्रिकी, रिटेल, आर्थिक सेवा, उच्च तंत्रज्ञान, मीडिया, औषध आणि आरोग्यशास्त्र, यासह अनेक खासगी क्षेत्रांसंदर्भात सविस्तर भाष्य करण्यात आले आहे.