Breaking News

साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ नाम विस्ताराची प्रधानमंत्री कार्यालयाने दखल घेतली

अहमदनगर, दि. 06, ऑक्टोबर - ऐतिहासिक    कोपरगाव तालूका येथील काकडी येते देशविदेशातील श्री साईभक्तांन करता आंतरराष्ट्रीय  विमानतळ उभारण्यात आले या काकडी येथील विमानतळा करता स्वताला साईभक्त म्हणवणारे शिर्डी व राहता तालूक्यातील कोणीच 35 वर्ष जमीनी दिल्या नाही या  विमानतळाला जमीनच मिळत नव्हती मात्र अल्पदरात पिकनारी जमिन कोपरगाव तालुक्यातील  लोकांनी रोजीरोटीची पर्वा न करता जमिनी दिल्या सदर विमानतळ ऐतिहासिक कोपरगाव तालुक्यात असल्याने श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोपरगावचे नाव देणे हा हक्क असतांना शासनाने या नामकरणात गोदावरीच्या तिरारावरच्या भूमी पुत्रांना विश्‍वासात न घेता घाईघाईने नागपूरच्या अधिवेशनात तास कायद्या नुसार नामकरण केल हा अन्याय आहे कोपरगाव तालुक्यावर तेव्हा कोपरगावचे भुमी पूत्र देशभक्ती सेवा मंच्या वतिने नूकतेच या श्री.साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळासाठी कोपरगावचे नाव देण्यात यावे याकरता गोदावरीच्या तिरावरच्या कोपरगावच्या भुमी पुत्रांनी आंदोलन उभारले असुन या संदर्भात शासन दरबारी लढा उभारला चालु आहे. याबाबत देशभक्ती सेवा मंच कोपरगाव यांच्या वतिने प्रधान मंत्री कार्यालयाला निवेदनात्मक प्रस्ताव पाठवण्यात आला होता.त्या संदर्भात प्रधानमंत्री कार्यालयाने दख्खल घेतली असून सदर केंद्रीय विमानतळ प्राधिकरण कार्यालय यांना सुचना देण्यात आल्या आहे. अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयाने देशभक्ती सेवा मंच कोपरगाव यांना दिनांक 20सप्टेंबर रोजीच्या पत्राव्दारे कळविली आहे.