Breaking News

पाच हजाराची लाच घेणारा मंडलाधिकारी रंगेहाथ पकडला

अहमदनगर, दि. 06, ऑक्टोबर - महसुली रेकॉर्डला नोंद लावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणारा अनिल कुंडलिक जाधव (वय-45,रा. सदाफुले वस्ती, ता. जामखेड)या मंडलाधिकार्‍यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जाधव याला अटक करण्यात आली  आहे. जामखेडच्या जुन्या तहसीला कार्यालयाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. 
याबाबतची माहिती अशी की नायगाव येथील मंडलाधिकारी अनिल जाधव यांने तक्रारदार यांचे वडील व चुलते यांनी खरेदी केलेल्या शेत जमिनीची तक्रारदार यांचे वडील व चुलते योच नावाची महसुली रेकार्डला नोंद लावून देण्यासाठी तक्रारदार  यांचेकडेपाच हजाराची लाच मागितली. ही लाच घेत असताना त्यास पकडण्यात आले. हा सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस कर्मचारी सुनील पवार, नितीन दराडे, एकनाथ आव्हाड, तन्वीर शेख दत्तात्रय बेरड, सतीश जोशी, प्रशांत जाधव,अंबादास हुलगे यांनी रचून जाधव याला पकडले.