Breaking News

सांगलीत युवकाचा शस्त्राने खून



सांगली, दि, 12, ऑक्टोबर - सांगली- मिरज रस्त्यावरील वॉन्लेस हॉस्पिटलच्या पिछाडीस असलेल्या क्वॉटर्समध्ये राहूल जयेंद्र लोंढे (वय 22) या युवकाचा अज्ञाताने डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. हा खून नाजूक संबंधातून झाला असावा, अशी शक्यता विश्रामबाग पोलिसांनी व्यक्त केली असून चौघा संशयितांना चौक शीसाठी ताब्यात घेतले आहे.

वॉन्लेस हॉस्पिटलच्या क्वॉटर्समध्ये राहूल लोंढे हा कुटुंबियासमवेत राहण्यास होता. या हॉस्पिटलच्या बंद अवस्थेतील बाह्य रूग्ण विभागाशेजारीच त्याचे घर आहे. त्याचे वडिल भारती रू ग्णालयात रखवालदार, तर भाऊ बेळगाव येथील एका खासगी रूग्णालयात ब्रदर म्हणून काम करतो. गत आठवड्यात राहूल लोंढे याने आदित्य हॉस्पिटलमधील नोकरी सोडून वॉन्लेस हा ॅस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून कामास सुरूवात केली होती.

मंगळवारी रात्री राहूल लोंढे हा कुपवाड येथे एका कार्यक्रमासाठी गेला होता. त्याठिकाणी एका मित्राच्या वाढदिवसालाही त्याने हजेरी लावली होती. मित्राच्या वाढदिवसाचा केक कापून रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घरी आला होता. त्यानंतर तो झोपी गेला होता. मात्र मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी राहूल लोंढे याला हाक मारून घराबाहेर बोलवले होते. त्यावेळी बहिणीकडून अंगावर चादर घेऊन तो घराबाहेर पडला होता.

बुधवारी सकाळी राहूल लोंढे हा घरात नसल्याचे पाहून आईने शोधाशोध सुरू केली. घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका झाडाखालील कट्ट्यावर त्याचे मित्र बसले होते. या मित्रांकडेही त्याच्या आईने चौकशी केली. मात्र त्यांनी त्याच्याबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले. अखेर शोधा शोध करून घरी परतत असताना त्याच्या आईला जुन्या बंद असलेल्या बाह्य रूग्ण विभागाशेजारील एका खोलीबाहेर त्याची चप्पल आढळली. त्याच्या आईने या बंद खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता राहूल लोंढे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. हे दृश्य पाहून त्याच्या आईने हंबरडा ङ्गोडला.

राहूल लोंढे याच्या आईचा आवाज ऐकून त्याच्या मित्रांसह या हॉस्पिटलच्या क्वॉटर्समधील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याच्या घराशेजारील मामानेही धाव घेऊन विश्रामबाग पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अज्ञातांनी राहूल लोंढे याच्या डोक्यात वर्मी घाव घालून त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादावादीतूनच राहूल लोंढे याचा खून झाल्याची चर्चा असली तरी त्याला नाजूक संबंधाची किनार असल्याचे विश्रामबाग पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद झाली असून चौघाजणांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.