Breaking News

फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने पत्नीची हत्या, पतीसह दोघांवर गुन्हा

पुणे, दि. 01, नोव्हेंबर - पत्नीला फ्लॅट दाखविण्याच्या बहाण्याने नेऊन एका बांधकामावरून ढकलून देत आत्महत्येचा बनाव रचणार्‍या पतीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. पत्नी मंदा पती देविदासच्या विवाहबाह्य संबंधाला अडथळा ठरत असल्याने तिची हत्या करण्यात आल्याचे समोर येत आहे.
देविदास याने विवाहबाह्य संबंधाला अडथळा ठरणा-या पत्नी मंदा हिला फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने नेऊन आळंदीजवळील च-होली खुर्दच्या एका बांधकामावरून ढकलून दिले.  यामध्ये अहमदनगरच्या मंदा देविदास पालवे (वय-28) या विवाहितेचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी पतीसह दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत मंदा पालवे यांचा भाऊ आदिनाथ गोरक्ष खेडकर (रा. चिंचपुरी हिझवे, ता. पाथर्डी, जि. नगर)  यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संगनमताने कट रचून खून केल्याचा गुन्हा आरोपी देविदास तुकाराम पालवे आणि घुले या दोघांसह एका अल्पवयीन मुलावर दाखल क रण्यात आला. आळंदी पोलिसांनी देविदास पालवे आणि घुले यांना अटक केली तर अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले. अधिक तपास आळंदी पोलीस करत आहेत.