Breaking News

बनावट नोटांचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरणी पोलिसांनाच अटक

हिंगोली, दि. 01, नोव्हेंबर - बनावट नोटा दाखवून चारपट रक्कम देण्याचे आमिष दाखवून पोलिसांनीच ऊसतोडणी मुकादमाकडून पाच लाख रूपये घेवून पोबारा केल्याच्या प्रकरणात  दोन पोलिसांनाच अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भटसावंगी येथील ऊसतोडणी मुकादम लक्ष्मण बोडखे यास हिंगोली वाहतूक शाखेचे का ॅन्स्टेबल प्रीतम भिमराव चव्हाण व हिंगोली पोलिस ठा ण्यातील चालक नवनाथ उत्तम जाधव तसेच वाकी ता. हदगावयेथील संतोष देशमुख यांनी एकलाख रूपयात चार लाखाच्या  नोटा देण्याचे कबूल केले. तुळजाई धाब्यावर पाचशे रूपयाची नोट चालवून प्रात्यक्षिक दाखविले. ठरल्याप्रमाणे पाच लाख रूपये घेवून वीस लाख रूपये घेण्यासाठी हिंगोली कळमनुरी  रस्त्यावरील मदरसा शिवारातील पाटील यांना दिले. मात्र नकली वीस लाख घेण्याआधीच घटनास्थळी पोलिसांची गाडी आल्याने फिर्यादीचा मित्र पळून गेला. गाडीतून उतरलेल्या पो लिसांनी तुझ्याकडे दारू आहे असे धमकावत फिर्यादीला तेथून हुसकावून लावत पाच लाख रूपये घेवून तेथून पसार झाले. या प्रकरणी तिघांविरोधात बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल होवून दोघांना अटकही झाली आहे. बनावट नोटांचे प्रकरण काही दिवसांपूर्वी हिेंगोली येथे गाजले असताना आता पोलिसच आरोपी झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.