Breaking News

कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्त्या

बीड, दि. 17, ऑक्टोबर - बीड जिल्ह्यात वडवणी शहरातील एका 52 वर्षीय शेतक़र्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली असुन या घटनेनं वडवणी तालुका सुन्न झाला आहे.
गेल्या आठ दिवसापासुन पावसाने थैमान घातल्यामुळं नगदी आलेलं पिकं वाया गेलं तसेच आपण घेतलेलं कर्ज कशाच्या पाई परत फेड करायची म्हणुन काल शिंदे यांना नैराश्य  आले होते.काल सकाळी शेतात चाललो म्हणुन सांगुन त्यांनी चिंचवण रोड वर असणाऱ्या मोहटा देवी मंदिराच्या पाठीमागे तळ्या शेजारील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन  आत्महत्या केली. हि घटना शेळी राखणार्या इसमाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केली त्यांच्या पर्यंत पोाहेंचे पर्यंत ते मरण पावले होते.त्यांच्या मागे पत्नी,एक  मुलगा,सुन्न,नातवंड अशा परिवार असुन एक वर्षापुर्वीच याचाचं एक मुलगा अनंता शिंदे यांनी कर्जाला कंटाळुन गळफास घेऊन आत्महत्या केली होती.