Breaking News

अमृतसागरची कर्मचार्‍यांना दिपावली भेट

साडेपाच कोटी बँकेत वर्ग

अहमदनगर, दि. 13, ऑक्टोबर - अमृतसागर दूध संघातर्फे दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर साडेपाच कोटी रुपये बँकेत वर्ग करण्यात आ
ले आहेत. दूध उत्पादकांच्या दूध किंमतीबरोबरच  कर्मचार्‍यांचे पगार, बोनस, वाहतूक ठेकेदार बिले आदींचा यात समावेश असल्याची माहिती अमृतसागरचे अध्यक्ष वैभवराव पिचड यांनी सांगितले.
तालुक्यातील दूध संस्थांना 16 सप्टेंंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीतील दूधाच्या पेमेंटपोटी 2 कोटी 16 लाख 69 हजार तसेच दूध भाव फरकापोटी (रिबेट) 2 कोटी 77 लाख  60 हजार असे 4 कोटी 94 लाख 30 हजार रुपये दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तसेच कर्मचार्‍यांचा सप्टेंबर महिन्याच्या पगारापोटी 6 लाख 65 हजार  114 रुपये तर सानुग्रह अनुदान म्हणून 38 लाख 46 हजार 569 रुपये आणि दूध वाहतूक ठेकेदारांची बिले व इतर खर्च असे 6 लाख 89 हजार 772 रुपये वर्ग करण्यात आली  असल्याची माहिती कार्यकारी संचालक डॉ. सुजीत खिलारी यांनी दिली. दूध संघाचे अध्यक्ष आ. वैभवराव पिचड, उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे व सर्व संचालक मंडळाने विशेष प्रयत्न  करुन दिवाळीपुर्वीच दूध उत्पादकांच्या खात्यात दूध पेमेंट व रिबेट म्हणून सुमारे साडेपाच कोटी रुपये दूध उत्पादकांच्या खात्यात वर्ग केले आहे. याबद्दल दूध उत्पादकांमध्ये  समाधानाचे वातावरण आहे.