Breaking News

मराठा पतसंस्थेचे पन्नास कोटी ठेवीचे उद्दिष्ट - शितोळे

अहमदनगर, दि. 03, ऑक्टोबर - मराठा सेवा संघ प्रणित अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेने अल्पावधीत केलेली प्रगती निश्‍चितच  कौतुकास्पद असून सर्व सभासदांच्या पाठबळाच्या जोरावर पतसंस्थेने 50 कोटी ठेवीचे उद्दिष्ठ ठेवले असल्याचे प्रतिपादन पतसंस्थेच्या उपाध्यक्षा शिवमती राजश्री  शितोळे यांनी यावेळी बोलतांना केले.
नेवासा येथील श्री ज्ञानेश्‍वर महाविद्यालयासमोर असलेल्या मराठा पतसंस्थेच्या नेवासा शाखेच्या 13 व्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात शिवमती शितोळे हया  अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.पतसंस्थेचे संचालक बाप्पासाहेब बोडखे, विठ्ठलराव गुंजाळ, सोपानराव मुळे, माजी गटविकास अधिकारी रामकृष्ण कर्डीले, बबनराव  खिलारी, ज्ञानदेव पांडूळे, प्रकाश कराळे, विधीज्ञ रविंद्र शितोळे, माजी प्राचार्य रघुनाथ आगळे, डॉ.मुरलीधर कराळे,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष  रावसाहेब घुमरे,  दशरथ मुंगसे, सरव्यवस्थापक अशोक वारकड, शाखा व्यवस्थापक भाऊसाहेब हारदे, संपतराव साठे उपस्थित होते.       प्रारंभी राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी  महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करणयात आले.
पतसंस्थेच्या नेवासा शाखेचे शाखाध्यक्ष भाऊसाहेब हारदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी गतशिक्षण अधिकारी विलास साठे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते  पी. आर. जाधव, डॉ. मुरलीधर कराळे, ज्ञानदेव पांडूळे, त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सचिन कर्डीले, जेष्ठ संचालक बाप्पासाहेब बोडखे, बबनराव खिलारी यांनी  नेवासा शाखेच्या कार्याचा गौरव आपल्या भाषणातून केला. यावेळी गुणगौरव समारंभात समाजाला विशेष योगदान देणार्‍यांचा सन्मान करण्यात आला.