महाराष्ट्र वार्षिकी महामानव’ पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची प्रकाशने
बुलडाणा, दि. 11, ऑक्टोबर - राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाव्दारे ‘महाराष्ट्र वार्षिकी 2017’ हा संदर्भग्रंथ व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाच्या विविध पैलूवर प्रकाश टाकणारे ‘महामानव’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. ही दोन्ही पुस्तके जिल्हयातील बुक स्टॉल, स्पर्धा परिक्षा केंद्र व जिल्हा माहिती कार्यालय येथे विक्रीस उपलब्ध आहे. वाचक व स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकात अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. वाचक विद्यार्थ्यांना पुस्तक खरेदी करावयाचे असल्यास जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कळविण्यात येत आहे.‘महाराष्ट्र वार्षिकी’ या पुस्तकात महाराष्ट्राची अधिकृत, वस्तुनिष्ठ माहिती, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, जनजीवन, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्रातील जिल्हे, शासनाचे विभाग, गत वर्षातील राज्य शासनाने घेतलेले महत्वाचे निर्णय, योजना, घडामोडी तसेच भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, मंत्रीमंडळ निर्णय, केंद्राचे व महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ, महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य, संसद सदस्य आदी माहितीचा समाविष्ट आहे. ‘महामानव’ पुस्तकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविधांगी पैलूवर आधारित अभ्यासपूर्ण लेख, राज्यातील मान्यवर लेखक, संशोधक, प्राध्यापक, संपादक, लेखक यांनी लिहिले आहे. यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चतुरस्त्र प्र तिमेची नेमकी व प्रभावीरित्या ओळख होते. हे पुस्तक अभ्यासक, संशोधक आणि वाचक या सर्वासाठी अतिशयक उपयुक्त आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे श्रेष्ठत्व आणि त्यांचे चौफेर व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी हे पुस्तक सहाय्यभूत ठरेल. दोन्ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असून अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत, बस स्थानकासमोर, बुलडाणा येथे संपर्क साधावा. तसेच कार्यालयाच्या 07262-242341 क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.