जागतिक 'फार्मसी डे'निमित्त रक्तदान शिबीर
औरंगाबाद, १० ऑक्टोबर - जागतिक 'फार्मसी डे' निमित्त जिल्हा परिषद जिल्हा औषध निर्माण अधिकारी संघटना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात 50 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीईओ मधुकर आर्दड, तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष केशवराव तायडे, सभापती विलास भुमरे, कुसुम लोहकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर उषा ढवणे,नीलेश शेळके,अन्वर पठाण यांनी परिश्रम घेतले.