जिल्हा परिषदेतील निवृत्तांसाठी 'पेन्शन सेल'
औरंगाबाद, १० ऑक्टोबर - जिल्हा परिषदेतील निवृत्तांसाठी 'पेन्शन सेल'च्या कक्षाचे नुकतेच उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड.देवयानी पाटील डोणगावकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड उपस्थित होते. उप मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, मुख्य लेखा वित्त अधिकारी जे. बी. चव्हाण यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन संघटनेचे अध्यक्ष वसंत सबनीस, के. जी. शेरे पाटील, मराठवाडा अध्यक्ष एस.आर.कुलकर्णी, गौतमकुमार जैन, श्रीरंग वाघमारे यांच्या हस्ते
स्वागत करण्यात आले.प्रास्ताविक पेन्शनरचे अध्यक्ष वसंत सबनीस यांनी केले. मराठवाडा अध्यक्ष एस.आर. कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्वागत करण्यात आले.प्रास्ताविक पेन्शनरचे अध्यक्ष वसंत सबनीस यांनी केले. मराठवाडा अध्यक्ष एस.आर. कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले.