मुलाचे अपहरण झाल्याचे भासवून व्यापाऱ्याला लुटले
औरंगाबाद, १० ऑक्टोबर - मुलाचे अपहरण झाल्याचे भासवून भरचौकात एका व्यापाऱ्याला दोन युवकांनी लुटल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली.
विजय अर्जुन ठाणगे (रा. शंभूनगर) यांचे किराणा दुकान असून ते सकाळी दशमेशनगरातील भारतीय स्टेट बँकेत गेले. बँकेत हप्ता भरून बाहेर आले असता बँकेबाहेर उभे असलेल्या दोघांनी त्यांना ‘आम्ही मुलाला ओलिस ठेवले, त्याला ठार मारू!’ अशी धमकी त्यांनी दिली. त्यांच्या मुलाचा फोटोहि दाखवला.
त्यांना घाबरवून त्यांच्याकडील एटीएम कार्ड, वीस हजार रुपये व मोबाईल घेवून ते पळाले घरी आल्यानंतर त्यांना मुलगा घरात आरामात बसलेला दिसला नंतर त्यांच्या एटीएम कार्डमधुनही भामटयांनी पैसश काढले. या प्रकरणी गुन्हयाची नोंद झाली आहे.