Breaking News

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातात दोन जण जागीच ठार

पुणे, दि. 24, ऑक्टोबर - मुंबईहून पुण्याकडे येणा-या गाडीचा भीषण अपघात होऊन दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (मंगळवार)  सकाळी सहाच्या सुमारास ओझर्डे गावच्या हद्दीत आढेगावजवळ झाला.शशिकांत प्रीतम साळुंखे, राहुल राजगुरू अशी मृत तरुणांची नावे आहेत. प्रतिक अमरे हा तरुण जखमी झाला  आहे. तिघेही पुण्यातील रहिवासी आहेत. प्रतिक अमरे याच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून सकाळी प्रवासी  वाहतूक करणारी गाडी प्रवासी घेऊन पुण्याच्या दिशेने येत होती. आढेगावजवळ आल्यावर चालकाला डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी रस्त्याच्या बाजूला 50  फूट खोल खड्यात पडली. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पुढील तपास तळेगाव पोलीस  करत आहेत.