Breaking News

चिंचवड परिसरात दहशत पसरविणा-या गुन्हेगाराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे, दि. 24, ऑक्टोबर - परिसरात तोडफोड करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्याचे आरोप असणार्‍या गुन्हेगाराला चिंचवड पोलिसांनी स्थानबद्ध केले  आहे. मागील नऊ महिन्यात एकूण 18 गुन्हेगारांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे.अविनाश शंकर पवार (वय 24 रा. आनंदनगर झोप चिंचवड) असे आरोपीचे नाव असून परिसरात  दहशत पसरवित असल्याच्या कारणावरुन पोलिसांनी त्याला स्थानबद्ध केले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2012 पासून तो गुन्हेगारी कृत्य करत होता. त्याच्यावर दंगा,  मारामारी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे आहेत. तसेच आरोपी पवार हा चॉपर, गुप्ती, कोयता यासारखी जीवघेणी हत्यारेही बाळगून होता.अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांच्या  मार्गदर्शनाखाली चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी कारवाई केली. त्यानुसार कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात आरोपीची रवानगी करण्यात आली आहे. पवार  याच्यावर वांरवार कारवाई करुनही त्या गुन्हे थांबले नाहीत म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.