Breaking News

दिवाळीनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी : सचिन पायलट

नवी दिल्ली, दि. 02, ऑक्टोबर - राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर दिवाळीनंतर घेऊ शकतात, असं वक्तव्य राजस्थानचे काँग्रेस नेते आणि माजी  मंत्री सचिन पायलट यांनी केलं. गेल्या अनेक वर्षांपासून राहुल गांधी उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचं बरंच काम पाहतात. त्यामुळे आता त्यांनीच पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम  बघावं, अशी वेळ आल्याचं पायलट म्हणाले.
राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, अशी पक्षात भावना आहे. राहुल गांधी उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचं बरंच काम पाहतात. मात्र त्यांना आता  जबाबदारी सांभाळण्याची वेळ आली आहे. काँग्रेसमध्ये सध्या पक्षांतर्गत निवडणुका सुरु आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर ते अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील, असं सचिन  पायलट यांनी एका मुलाखतीत सांगितलं. दरम्यान प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात येणार का, याबाबतही सचिन पायलट यांनी प्रश्‍न विचारणार आला. मात्र हा  त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रियांका गांधी काँग्रेस परिवाराशी संबंधित आहेत. त्यामुळे त्या योग्यवेळी त्यांचं योगदान देतच असतात. त्या  सक्रिय राजकारणा येऊ किंवा नाही, हा त्यांचा आणि कुटुंबाचा वैयक्तिक निर्णय असेल, असंही ते म्हणाले.