Breaking News

मालाड- सांताक्रुज स्थानक परिसरात मनसे कार्यकर्ते व फेरीवाल्यांमध्ये बाचाबाची

मुंबई, दि. 23, ऑक्टोबर - मालाड आणि सांताक्रुज रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि फेरीवाल्यांमध्ये  बाचाबाची झाल्याचे वृत्त मिळत आहे. फेरीवाले जागा सोडण्यास तयार नसल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मात्र, स्थानिकांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला. मालाड आणि  सांताक्रुज रेल्वे परिसरात दोन दिवसांपासून मनसेकडून फेरीवाला हटाव मोहीम सुरू आहे. याचदरम्यान मनसे कार्यकर्ते आणि फेरीवाल्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या प्रकरणी  मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.