Breaking News

लोकलमध्ये अश्‍लील चाळे करणा-या विकृताला अटक

मुंबई, दि. 23, ऑक्टोबर - लोकलमध्ये महिलेकडे बघून अश्‍लील चाळे करणा-या विकृताला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज ट र्मिनस (सीएसएमटी) स्थानकाहून ही लोकल बेलापूरच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी सीएसएमटी आणि मस्जिद स्थानकादरम्यान या व्यक्तीने अश्‍लील चाळे केल्याचे उघडकिस  आले होते. कृपा भोदेबा पटेल अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि महिलेने दिलेल्या ध्वनीचित्रफितच्या माध्यमातून कृपाला अटक करण्यात  आली आहे.