Breaking News

महापैार पदासाठी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब

औरंगाबाद, दि. 23, ऑक्टोबर - संभाजीनगर ता. 22 येणा-या 29 ऑक्टोबर 2017 रोजी संभाजीनगर महानगपालिकेत शिवसेना भाजप महायुतीचाच महापौर बसणार असून  युतीधर्माप्रमाणे करार अडीच वर्ष पाळणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत देऊन महायुतीचे उमेदवार  म्हणून शिवसेनेचे नंदकुमार घोडेले यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दोन दिवसापूर्वी झालेल्या चर्चे नंतर महायुतीच्या नेत्यांनी आज सयुंक्तिक बैठक घेतली.
या पत्रकार परिषेदेस भाजप राज्यउपाध्यक्ष डॉ भागवत कराड, प्रवक्ते शिरीष बोराळकर. आमदार अतुल सावे, महापौर बापू घडामोडे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी शिवसेनेच्या वतीने  सहसंपर्कप्रमुख सुहास दासरथे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल महापौर पदाचे उमेदवार नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती.