Breaking News

नागपूर ते गोंदियापर्यंत विशेष रेल्वे; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था

नागपूर, दि. 19, ऑक्टोबर - एसटी महामंडाळाच्या संपामुळे प्रवाशांच्या गैरसोय ह यासाठी नागपुरातील इतवारी रेल्वे स्टेशनमधून गोंदियापर्यंत जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात  येणार आहे. तसेच शहरातील विविध 22 ठिकाणावरुन खाजगी बसेस प्रवाशांच्या सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी  दिली.एसटीच्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे गोंदियासाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार असून उद्या, गुरुवारपासून सकाळी 8.30 वाजता संपाच्या कालावधीत  सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे गाडी इतवारी, कळमना, कामठी कन्हान, सालवा, चाचेर, तारसा, रेवराल, खात, भंडारा, कोका, तुमसर, मुंडीकोटा, तिरोडा, काचेवानी, गंगाझरी, गों दिया या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. तसेच गोंदिया ते नागपूर परतीच्या प्रवासाकरिता गोंदियावरुन दुपारी 4.30 वाजता सुटणार असून प्रवाशांनी विशेष रेल्वेचा लाभ घ्यावा, असे  आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.