Breaking News

कर्जमाफीची यादी शुध्द मराठी भाषेत प्रसिध्द करण्याची ’मनसे’ची मागणी

औरंगाबाद, दि. 28, ऑक्टोबर - छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेची शेतक-यांची कर्जमाफीची यादी इंग्रजी ऐवजी शुध्द मराठी भाषेत छापण्यात यावी अशी मागणी ’मनसे’  कडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गंगापुर शाखेच्या वतीने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की छत्रपती शिवाजी  महाराज सन्मान योजने अंतर्गत करण्यात आलेल्या शेतक-यांची कर्ज माफीची यादी इग्रंजी भाषेत न करता मराठीत प्रसिद्ध करण्यात यावी.