Breaking News

नाशकात अनैतिक संबंधातून एकाची हत्या

नाशिक, दि. 28, ऑक्टोबर - नाशिकच्या पंचवटी भागात अनैतिक संबंधातून एकावर धारदार शस्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना आज दुपारच्या सुमारास उघडक ीस आली. दशरथ बाळू ठमके (रा. सम्राट नगर पेठरोड) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित गणेश वसंत गरड (रा. पंचवटी) यास  ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, 21 ऑक्टोबर पासून मयत दशरथ ठमके बेपत्ता झाला होता. याबाबत त्याचा भाऊ संतोष बाळू ठमके याने पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार  दाखल केली होती.पोलीस त्याचा शोध घेत होती. दरम्यान, पेठरोडवरील शरद पवार मार्केटच्या डाळिंब विभाग परिसराच्या मागच्या बाजूला त्याची हत्या करण्यात आली आणि त्याचा  मृतदेह पाण्याच्या टाकीत आज दुपारच्या सुमारास आढळून आला. त्यांच्या अंगावर धारदार शास्राने वार करण्यात आल्यानंतर त्याला येथील पाण्याच्या टाकीत टाकून देण्यात  आल्याची माहिती पोलिसांनी दिली.अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे बोलले जात असून मयताच्या पत्नीसोबत संशयिताचे अनैतिक संबंध असल्यामुळे ही हत्या झाल्याचे समजते.