Breaking News

जलयुक्त शिवार अभियानाच्या विविध कामांची बागडे यांनी केली पाहणी

परभणी, दि. 28, ऑक्टोबर - परभणी तालुक्यातील झरी या गाव परिसरात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या विविध कामांची विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी  पाहणी केली. त्यानंतर गावालगतच्या नाम नदीच्या पात्रातील जलसाठयाची व अभियानाअंतर्गत विविध कामांची पाहणी करण्यात आली. झरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या  इमारतीची पाहणी करून बागडे यांनी कृषी विभागामार्फत लाभार्थ्यांना शेतीउपयोगी साहित्याचे वाटप केले. गावात शौचालय बांधून त्याचा उपयोग करणा-या ग्रामस्थांचा  ग्रामपंचायतीमध्ये बागडे यांच्या हस्ते धनादेश देवून गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, उपविभागीय अधिकारी  सुचेता शिंदे आदी मान्यवर तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.