Breaking News

जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यावर गुन्हा दाखल

बीड, दि. 28, ऑक्टोबर - गेवराई तालुक्यातील धारवंटा येथील एका व्यक्तीस मारहाण केल्याप्रकरणी जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यासह तिघांवर गेवराई पोलीस  ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
नारायण अंबादास शेळके नावाच्या व्यक्तीस गेवराई शहरातील जुन्या बस स्थानकाजवळ 26 ऑक्टोबर रोजी एका मल्टिस्टेटसमोर उभे असता विजयसिंह पंडित, कैलास नलावडे,  ज्ञानेश्‍वर आरबड या तिघांनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. सदर फिर्यादीवरून तिन्ही आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला  आहे. विजयसिंह पंडित हे बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य आहेत.