Breaking News

चारित्र्यावर संशय घेत पत्नी व सावत्र मुलीवर कोयत्याने हल्ला

बीड, दि. 28, ऑक्टोबर - चारित्र्यावर संशय घेत पतीने आपल्या पत्नी व विवाहित सावत्र मुलीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना आज दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घडली असून  दोघींना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. आरोपी पती स्वत:हून पोलिस ठाण्यात स्वाधीन झाला. 
अच्यूत भानुदास पटाईत (वय 46) याने आज दुपारी आपली पत्नी वैजंता नामदेव कापरे (वय 45) व सावत्र मुलगी अश्‍विनी केशव खामकर (वय 19) या दोघींवर कोयत्याने हल्ला  केला. यात दोघीही गंभीररित्या जखमी झाल्या असून चारित्र्याच्या संशयावरून मारहाण केली असल्याचे सांगण्यात आले.