Breaking News

नोटबंदीच्या काळात गरिब जनतेला त्रास : नितीन गडकरी

नागपूर, दि. 09, ऑक्टोबर - नोटाबंदीच्या काळात गरिबा जनतेला त्रास झाला, अशी कबुली केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नागपुरात  राष्ट्रीयता कारागीर पंचायतच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. त्यांनी नोटाबंदीच्या काळात सर्वसामान्यांना आलेल्या अडचणींचा उल्लेख केला. नोटाबंदीच्या काळात  अनेक गरीब खुश होते. मी त्यांना विचारलं, की तुम्ही खुश का आहात का? तर नोटाबंदीचा त्रास होतोय, पण श्रीमतांच्या घरावर छापे पडत असल्याने आनंदी  असल्याचं गरीब सांगायचे, असं गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी यांनी रामदेव बाबांच्या संपत्तीचा उल्लेखही केला. रामदेव बाबांना त्यांच्या नावावर कोणतीच संपत्ती न ठेवण्याचा सल्ला दिला. रामदेव बाबा अनेक वस्तू  बनवतात. पाहता पाहता रामदेव बाबा यांच्या उद्योगाची उलाढाल 70 हजार कोटींच्या घरात गेली आहे. रामदेव बाबांना सांगितलं, की सामान्य लोक तुम्हाला खूप  श्रीमंत समजतात. समाजात अती श्रीमंतांबद्दल चिड असते. म्हणून रामदेव बाबांनी त्यांच्या नावावर एकही रुपया ठेवलेला नाही. ते फक्त सामाजिक उद्यमशीलता  करतात, असंही गडकरींनी सांगितलं.