शुभम कोठारीची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
सोलापूर, दि. 09, ऑक्टोबर - सुवर्ण स्पोर्ट्स अकादमीचा डावखुरा फिरकी गोलंदाज शुभम अशोक कोठारी याची महाराष्ट्राच्या 23 वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सी.के. नायडूू क्रिकेट स्पर्धेसाठी तो महाराष्ट्र संघातून खेळेल. सलग दुसर्यांदा त्याची या स्पर्धेसाठी निवड झाली. यंदाच्या वर्षात झालेल्या राज्य स्पर्धेत त्याने पुण्याच्या अँबिशियस संघाकडून खेळताना. चार सामन्यातून त्याने दोन्ही डावातून 24 बळी टिपले. निंबाळकर ट्रॉफीमध्ये एका सामन्यातून तर गुजरात दौर्यावर गेलेल्या सराव सामन्यात महाराष्ट्र संघातून खेळताना सामन्यातून बळी घेत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते. या कामगिरीवर तो निवडला. त्यास योगेश इंडी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन रणजितसिंह मोहिते संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सु यांनी अभिनंदन केले.