Breaking News

दिल्लीत फटाके बंद कायम

नवी दिल्ली, दि. 09, ऑक्टोबर - राजधानी दिल्लीत यावर्षी विनाफटाक्यांची दिवाळी साजरी होणार आहे. फटाके विक्रीवर गेल्या वर्षी घालण्यात आलेली बंद सुप्रीम  कोर्टाने यावर्षीही कायम ठेवली आहे. पोलिसांनी दिलेले सर्व परवाने रद्द करण्यात आले आहेत.
यावर्षी 12 सप्टेंबर रोजी देण्यात आलेला आदेश 1 नोव्हेंबारपासून लागू होणार आहे. या आदेशामध्ये दिल्ली एनसीआरमध्ये काही अटींसह फटाके विक्रीला परवानगी  देण्यात आली होती. मात्र आता या नव्या आदेशामुळे विक्रेत्यांना 1 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री करता येणार नाही. यावर्षी फटाक्यांवर बंदी घातल्यानंतर प्रदूषण  कमी होतं का, हे पाहणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. वाढतं प्रदूषण पाहता गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टाने फटाके विक्रीवर बंदी घातली होती.