Breaking News

सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी नदी जोड प्रकल्पाला गती - गडकरी

नांदेड, दि. 24, ऑक्टोबर - सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी 8 लाख कोटींचे तीस नदी जोड प्रकल्प हाती घेतले असून शेतक-यांची आत्महत्त्या थांबविण्यासाठी सिंचनक्षेत्र 40 टक्क् यांपर्यंत नेणार असल्याचे आणि सिंचनासाठी मराठवाडयाला 80 हजार कोटी रूपये देणार असल्याची घोषणा रस्ते, वाहतूक आणि महामार्ग तथा जलसंपदा विभागाचे केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी केली. आज सोमवारी माहूर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले.या वेळी त्यांनी वरिल घोषणा केली. येत्या काळात नदी जोड प्रक ल्पाच्या माध्यमातून गंगेची पाणी कावेरी पर्यंत घेवून जाणार असून भविष्यात लातूर सारखी पाणी टंचाई एकाही गावात उदभवू नये म्हणून हे प्रयत्न चालु असल्याचे ते म्हणाले. 
कार्यक्रमाला केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, वस्त्रोद्योग आणि पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री मदन येरावार, खा.  राजीव सातव, लातूरचे खा. सुनील गायकवाड, खा. नागेश घोडाम, आ.प्रदीप नाईक, आ. सुभाष साबणे, आ. नागेश पाटील अष्टीकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. राजू  तोडसाम, आ. राजेंद्र नजरधने, आ. तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष फेरोज दोसानी, अदी उपस्थिती होते. रेणुकामातेच्या दर्शनासाठी रोपवेचे कामही लवकरच मार्गी लावू, माहूरच्या विक ासासाठी कुठलीही कमतरता पडू देणार नाही असे ते म्हणाले. देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाली अजूणही रस्ते, वीज ,पाणी या प्राथमिक गरजांची चर्चा आपण करतो ही दुंर्दे वाची बाब आहे म्हणूनच आता शेतक-यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सिंचनक्षेत्र वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट, पँन्ट आणि चडडी
नितीन गडकरी यांनी भाषणात मारलेल्या कोपरखळया या नेहमी चर्चेचा विषय बनतात तसेच आजहि घडले महाराष्ट्रातील वेगवगेगळया प्रकल्पासाठी कोटयावधीची निधीची घोषणा के ल्यानंतर ते म्हणाले की मी महाराष्ट्राचा भूमिपूत्र असल्याने माझ्या कडून जमेल तेवढे अधिकाधिक महाराष्ट्रासाठी करतो पण राज्याने काहीतरी करावे निदान नदया आणि धरणातील  गाळ तरी काढावा. नवरदेवाला मी कोट देईन, टाय देईन ,सोबत दस्ती, टोपी पण देईन पण निदान चडडी बनियन तरी तुम्ही दयावी असे ते राज्यातील मंत्र्यांकडे पाहून म्हणाले.