Breaking News

शेतकर्‍यांचा सातबारा कोरा केल्याबद्दल शेतकरी मिशनकडून मुख्यमंत्र्याचे आभार

नागपूर, दि. 18, ऑक्टोबर - छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंमध्ये सर्व अडचणीचे शेतकर्‍यांचा समावेश करून 2009 ते 2016 पर्यंत पीककर्ज थकीत असलेले व ब ँकांनी पुर्नगठीत केलेले 31-7-2017 पर्यंतचे हप्ता न भरलेले वा भरलेले शेतकरी यांचा समावेश करून तसेच घरात वडील व 18 वर्षावरील सर्व वेगवेगळी सातबारा असणारी मुले  स्वतंत्रपणे कर्जमाफी पात्र करून मयत शेतकर्‍यांचे वारस यांनाही कर्जमाफीचा लाभ देत आपला शब्द कायम ठेऊन पहील्या टप्पात नरक चतुर्दशीच्या मुहुर्तावर आज बुधवारी (18  ऑक्टोबर) राज्यातील सुमारे दहा लाख शेतक-यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केल्याबद्दल तर दिवाळीनंतर महिनाभरात सर्वच पात्र शेतक-यांच्या बँक खात्यावर रक्कम  जमा करण्यात या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेचे कै वसंतराव नाईक शेतकरी मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यांनी स्वागत केले असुन मुख्यमंत्र्यांना देशाच्या इतिहासात  अभुतपुर्व असलेल्या महाराष्ट्राच्या शेतकर्‍यांच्या अल्प व मध्यम अवधीच्या सर्व अड्चणीतल्या व शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्यातील 98 टक्के शेतकर्‍यांच्या सात बारा कोरा क रणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनें’ची तात्काळ अंबलबजावणी केल्याबद्दल आभार मानले आहेत.
व्यावसायिक बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्जदार शेतक-यांचे आकडे फुगवून सांगतात आणि नंतर कमी करतात त्यामुळे या बँकांनी आधी आणि नंतर दिलेली कर्जदारांची आकडेवारी  केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास देण्याची मिशनची मागणी लाऊन धरल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किशोर तिवारी धन्यवाद दिले आहेत . व्यावसायिक बँक ांनी फुगवून दिलेली आकडेवारी सरकार आता शहानिशा करण्यासाठी केंद्र सरकारकडे व रिझर्व्ह बँकेकडे देणार असुन बँकांनी दिलेल्या या आकडेवारीवर विश्‍वास ठेवून कर्जमाफी  दिली असती तर राज्यातील करदात्यांचा पैसा बोगस खात्यांमध्ये गेला मात्र हा प्रयन्त मुख्यमंत्र्यांनी हाणुन पाडला कारण सहकारी व व्यावसायिक बँकांनी मिळून 89 लाख शेतकरी  कर्जमाफीसाठी पात्र असे आधी सरकारला सांगितले होते. मात्र सरकारने थेट लाभधारक शेतक-यांकडून अर्ज भरून घेणे सुरू केल्यामुळे या बँकांचे पितळ उघडे पडले व पहिल्या  टप्प्यात साडेतेरा लाख कर्जदार शेतक-यांची संख्या या बँकांनी कमी केली यामुळे कर्जमाफीच्या गोरखधंद्याचे पितळ जगासमोर आल्याचा दावा किशोर तिवारी यांनी केला आहे. क र्जमाफीच्या पहिल्या दिवशी 10 लाख शेतक-यांच्या खात्यांत कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली असुन आणि येत्या नोव्हेंबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल तसेच पूर्वी ब ँका राईट ऑफ केलेली खाती दाखवत आणि कर्जमाफीचे पैसे घेत असत, मात्र ते आता शक्य होणार नाही. असे किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले.