Breaking News

वीज वितरण कंपनीच्या लिपिकास लाच घेताना पकडले

औरंगाबाद, दि. 05, ऑक्टोबर - वीज वितरण कंपनीच्या कन्नड येथील विभागीय कार्यालयात कार्यरत लिपिक भगवान सुदाम रामकर (वय 40 वर्षे) याला दहा  हजारांची लाच स्वीकारताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. आपल्याच कार्यालयात कार्यरत कर्मचार्याचे थकीत वेतन काढण्यासाठी रामकर याने  30 हजाराची लाच मागितली होती.त्यापैकी पहिला हफ्ता म्हणून 10 हजार रुपये लाच म्हणून स्वीकारतांना त्यास रंगेहाथ पकडले.सदर पिडीत कर्मचार्याच्या पत्नीने  तक्रार केल्यामुळे ही लाचखोरी पकडण्यात आली. क न्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.