Breaking News

माजी सैनिकांसाठी प्लास्टिक क्लस्टरला 12 कोटींचे अनुदान

औरंगाबाद, दि. 05, ऑक्टोबर - औरंगाबाद निपाणी येथील ’एक्स सर्व्हिसमेन प्लास्टिक क्लस्टरला’ केन्द्र शासनाचे रू. 10.50 कोटी व राज्य शासनाचे रू. 1  कोटी 24 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. दिनांक 5 सप्टेंबर, 2017 रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या उद्योग मंत्रालयाच्या बैठकीमध्ये ही मंजूरी देण्यात  आली असल्याची माहिती औरंगाबाद विभागाचे उद्योग सह संचालक बळवंत जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबियांनी एकत्र  येवून उत्पादन क्षेत्रातील अशा प्रकारचे हे देशातील पहिलेच क्लस्टर असुन त्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे या सर्व माजी सैनिक उद्योजकांना संपूर्ण सहाकार्य  मिळेल याची काळजी घेतली जात आहे. तसेच केंद्रीय सैनिक कल्याण बोर्ड, सरंक्षण मंत्रालयातील माजी सैनिक कल्याण विभाग सुध्दा या उद्योजकांना आर्थिक मदत  करणार आहे. या क्लस्टरमध्ये एकूण 31 उद्योग कार्यरत असुन त्यांची सध्याची उलाढाल 60 कोटी रूपये असुन ती 90 कोटी रूपयापर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे  व त्यासाठी कसोशीचे प्रयत्न करणार असल्याचे क्लस्टरचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर राम नागरगोजे यांनी सांगितले. या क्लस्टरला केंद्रातील उद्योग मंत्रालयातर्फे  मंजूरी देण्यात आली आहे. या क्लस्टरमध्ये 22 महिला उद्योजक असून केंद्राकडून या क्लस्टरचे कौतुक करण्यात आले असून. केंद्राच्या व लष्काराच्या धोरणाप्रमाणे  ’सेना से उद्योग’ या योजनेखाली राज्यातील इतर माजी सैनिकांनी उद्योगाकडे वळून रोजगार निर्मितीमध्ये शासनास सहकार्य करावे असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष  देसाई व राज्याचे उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी 8 ऑगस्ट, 2017 रोजी देवगिरी रबर क्लस्टरच्या उद्घाटनप्रसंगी आवाहन केले. या क्लस्टरमध्ये  प्लास्टीकची विनलेली पोती, ताडपत्री, चटई, गन कव्हर्स, विमान व हेलिकॉप्टर कव्हर्स, सैनिकांना लागणारे वाटरप्रुफ बेड कव्हार्स, स्कुल व ट्रॅव्हल बॅग्स, प्लास्टीक  कोटेड पेपर डिशेस तयार केले जातात. तयार झालेल्या मालाला/ मिल्ट्रीची बाजारपेठ उपलब्ध असून माजी सैनिक उद्योजकांनी तयार केलेल्या प्रोडक्टसला डिफेन्स  परचेस प्रोठााममध्ये 15 % आरक्षणची सुविधा आहे. या क्लस्टरद्वारे किमान 1500 माजी सैनिक व त्यांच्या परिवारांना रोजगार उपलब्ध होईल.