राष्ट्रीय पेयजल योजनेत गैरव्यवहार
। चौकशीसाठी युवकांचे उपोषण । आश्वासनानंतर उपोषण स्थगित
अहमदनगर, दि. 03, ऑक्टोबर - तब्बल 2 कोटी 10 लाख रुपये खर्च करून अर्धवटरित्या सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेतील मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थानिक युवकांनी केला आहे. या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण चव्हाण आणि त्यांच्या सहकार्यांनी आज दि.2 ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. दरम्यानन जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. पी. पाटील यांनी या उपोषणाची दाखल घेत या योजनेची एक महिन्यात चौकशी वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणार्थींनी हे स्थगित केले.यासंदर्भात चव्हाण यांनी सांगितले, की प्रवरासंगम ग्रामस्थांसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अर्धवट करण्यात आले. ही योजना पूर्ण होऊनही गावाला 3/4 दिवसांतून एकदा पाणी मिळते. कोट्यवधी रूपये खर्च होऊनही प्रवरासंगम ग्रामस्थांच्या घशाला कोरड आहे. प्रवरासंगम नदीपासून फिल्टर प्लँटपर्यंत या योजनेत 5 इंची जलवाहिनी टाकणे अपेक्षित असतांना 4 इंची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. फिल्टर प्लँट आणि टाक्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मुख्य जलवाहिनीमध्ये व्लाव्ह टाकून खोदाई आणि पाइपची बचत करून मोठा गैरव्यवहार करण्यात आला आहे. जुनी म्हळसपूर जलवाहिनी वापरून पाईप बचत करण्यात आली आहे. डी. वॉटरिंगचे पैसे शंभर पटीने जास्त घेण्यात आले आहेत. रोड क्रॉसिंगचे 1. 5 लाख रुपये रोड क्रॉस न करताच घेण्यात आले आहेत. जॅकवेलचे काम पूर्ण करण्यात आले नाही. ही अर्धवट योजना ताब्यात घेऊ नये, असा दि. 15 ऑगस्ट 2016 रोजी गारम्साहेत ठराव करूनही ही योजना ताब्यात घेण्यात आली, हाच मोठा प्रश्न आहे. हे आणि अन्य अनेक प्रश्न या योजनेवरून निर्माण झाले आहेत. अधिकार्यांनी दिलेल्या आश्वासानुसार या योजनेची एक महिन्यात चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.
या उपोषणात गजानन गवारे, रमेश काळे, नितीन भालेराव, संतोष मोरे, श्रीरंग डावखर, शिवाजी शिंदे, भानुदास मते, राजेंद्र बोरूडे, भास्कर गायकवाड, राजू भालेराव, चेतन जगधने, ज्ञानेश्वर भालेराव, गंगाधर रासने आदींनी भाग घेतला.