अशोक साखर कारखान्याच्या कार्यलक्षी संचालकपदी चिडे आणि शेख
अहमदनगर, दि. 03, ऑक्टोबर - अशोक सहकारी साखर कारखान्याच्या कार्यलक्षी संचालकपदी गोरक्ष चिडे व नजिर शेख यांची निवड करण्यात आली. साखर कामगार सभेचे अध्यक्ष ज्ञानदेव पाटील आहेर व सरचिटणीस अविनाश आपटे यांनी नूतन पदाधिकार्याचां सत्कार केला.
साखर कामगार सभेचे सरचिटणीस अविनाश आपटे यांनी अशोक साखर कारखान्याने दोन कार्यकारी संचालक घ्यावे अशी मागणी केली होती. कारखान्याचे सुत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत यास मान्यता दिली. त्याप्रमाणे गोरक्ष चिडे व नजिर शेख यांची कार्यलक्षी संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. यावेळी दोघांनाही पुढील कार्यासाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. सहकार कायद्यातील सुधारणेनुसार 15 संचालकापर्यंत 1 व 15 पेक्षा जास्त संचालक असल्यास 2 कार्यकारी संचालक प्रतिनिधी नेमावेत. अशोक कारखान्याने यापूर्वी 1 संचालकाची नेमणूक केली होती. साखर कामगार सभेचे सरचिटणी अविनाश आपटे यांनी कायद्यातील सुधारणेनुसार कार्यलक्षी संचालक निवडावेत अशी मागणी केली होती. त्यास संचालक मंडळाने सहमती दिली.