Breaking News

मासेमारी करताना तरुणाचा बुडून मृत्यू

जळगाव, दि. 28, ऑक्टोबर - जळगाव येथील धरणात मासेमारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात प्रल्हाद ङोंडू भोई (35, मूळ रा. सामरोद, ता.जामनेर) मच्छीमाराचा पाय  अडकल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना धरणगाव परिसरात घडली. 
प्रल्हाद ङोंडू भोई हा सामरोद येथील रहिवासी असून तो फुलफाटा (धरणगाव) येथे कुटुंबियासह वास्तव्यास आहे. प्रल्हाद भोई हा मासेविक्रीचा व्यवसाय करून कुटुंबियांचा उदर निर्वाह करत होता. ही गोष्ट याचठिकाणी मासेमारी करत असलेले रामचंद्र भोई, तुळशीराम भोई यांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन मदत केली व त्यांच्या  मदतीला गावातील इतरही काही जण धावून आले व त्यांनी प्रल्हादला पाण्यातून बाहेर काढले व धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. प्रल्हादला जळगावला हल विण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिका-यांनी प्रल्हादला मृत घोषीत केले. प्रल्हादच्या पश्‍चात पत्नी, मुले,मुली  तसेच भाऊ, वहिणी असा परिवार आहे.