Breaking News

नाशिक, अहमदनगर, जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

मुंबई, दि. 05, ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे शेतकर्‍यांच्या पाठीशी असून शेतकरी बांधवांच्या भावनांशी खेळणार्‍या भाजप-शिवसेना युती सरकारच्या  विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक आक्रमक आंदोलने करत आहे. आज उत्तर महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर आणि जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा  काढण्यात आला.
अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालायावर मोर्चा काढून निवेदनाव्दारे राज्य व केंद्र सरकारकडे विविध मागण्या केल्या. यावेळी माजी  विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ. अरुणकाका जगताप, अंकुशराव काकडे, चंद्रशेखर घुले पाटील, दादाभाऊ  कळमकर, आमदार वैभवराव पिचड आणि आमदार संग्रामभैय्या जगताप उपस्थित होते.
शेतक-यांची संपूर्ण सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत  इंधनाच्या दरात प्रचंड प्रमाणात घसरण झालेली असून सरकारने पेट्रोल, डीझेल व गस यांचे दर त्वरित कमी करण्यात यावे. खूप जागावाजा करून या सरकारने  मेकइन इंडिया, मेकइन महाष्ट्र सारख्या घोषणा दिल्या. परंतु बेरोजगारी वाढतच आहे असल्याने असंख्य कुशल व अकुशल कामगारांना तात्काळ रोजगार उपलब्ध  करण्यात यावा, अशा मागण्या निवदेनाद्वारे करण्यात आल्या.
सध्याच्या परीस्थित शेतकरी हाच सर्वाधिक दुखी घटक असून शेतकर्‍यांच्या बिकट परिस्थितीला केंद्र व राज्यातील भाजप - शिवसेना युती सरकारच जबाबदार  असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार यांच्या नेतृत्वाने सटाणा येथे बैलगाडीवरून मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन  करण्यात आले. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष खेमराज कोर, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी उपस्थित  होते.