लक्ष्मी नारायण थिएटर समोरील प्रिती हॉटेलला भीषण आग
पुणे, दि. 09, ऑक्टोबर - लक्ष्मीनारायण थिएटर समोरील प्रिती हॉटेलला आज (सोमवार) सकाळी शॉर्ट सर्किटने भीषण आग लागून हॉटेलचा पोटमळा जळून खाक झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. पुणे सातारा रोडवरील लक्ष्मी नारायण थिएटर समोरील मुख्य रस्त्यावर हॉतिी असून, या ठिकाणी बार अँड रेस्टॉरंट आहे. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अचानक धूर येत असल्याचे आढळून आले. नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आग नियंत्रणात आणली. मात्र, तो पर्यंत हॉटेलच्या पोटमाळ्यावरील संपूर्ण बैठक व्यवस्था जळून खाक झाल्याचे अग्निशामक दलाचे जवान सोनवणे यांनी सांगितले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून हॉटेलचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.