Breaking News

नाणेफेक जिंकून भारताची फलंदाजी

मुंबई, दि. 22, ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड वन डे मालिकेतील पहिल्या सामन्याला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. टीम  इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना कर्णधार विराट कोहलीच्या कारकीर्दीतील 200 वा वनडे सामना आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत भारतानं 4-1 असा विजय साजरा केला होता. त्याआधी श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत 5-0  अशी धूळ चारत टीम इंडियानं मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया सारख्या तगड्या संघांना हरवल्यानंतर किवींनाही पराभूत  करण्यास टीम इंडिया सज्ज झाली आहे. तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत एकतर्फी विजय मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. रहाणे, दिनेश कार्तिक और  शार्दुल ठाकूर या खेळाडूंना पहिल्या वनडेतून वगळण्यात आलं आहे. हा सामना कर्णधार विराट कोहलीच्या कारकीर्दीतील 200 वा वनडे सामना आहे. 200  सामने खेळणारा विराट भारताचा 13वा खेळाडू ठरणार आहे. 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दंबुला वन डेत विराटनं आपल्या कारकीर्दीतील पहिला सामना  खेळला होता.