Breaking News

ऊसाला भाव घोषित करेपर्यंत ऊस तोडणी नाही; शेतकरी नेत्यांचा इशारा

बीड, दि. 28, ऑक्टोबर - सर्व कारखान्यापेक्षा आपण जास्त भाव देणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. मात्र जास्तीचा म्हणजे नेमका किती देणार ?  शासनाने 3,500 रूपये भाव द्यावा, अशी आमची मागणी असून जोपर्यंत शासन ऊसाला भाव घोषित करत नाही तोपर्यंत ऊस तोडू देणार नसल्याचा इशारा शेतक-यांचे नेते भाई  गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे. जोपर्यंत शासन ऊसाचा भाव घोषित करत नाहीत तोपर्यंत ऊस तोडू देणार नसल्याचा इशारा थावरे यांनी दिला आहे. आज सकाळी माजलगाव  तालुक्यातील गावंदरा येथील शेतक-यांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते.