Breaking News

बदलीच्या धसक्याने शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

बीड, दि. 28, ऑक्टोबर - ऑनलाईन बदलीचा फॉर्म भरताना आलेला ताण, बदली कोठे होईल या भीतीने आलेला मानसिक दबाव यामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने  सहशिक्षक मधुकर दत्तात्रय साळवे वय 49 यांचे निधन झाले. ते साळेगाव येथील शाळेवर सहशिक्षक म्हणून काम करत होते. मागील दोन दिवसांपासून शिक्षक बदलीचा नेट कॅफेवर  फॉर्म भरण्यासाठी रात्रभर जागरण आणि बदली कुठे होईल याच्या भीतीचा ताण सहन न झाल्यामुळे सहशिक्षक मधुकर दत्तात्रय साळवे ( वय 49) यांचे हृदयविकाराच्या तीव्र  झटक्याने निधन झाले. ते साळेगाव केंद्रातील मांगवडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. बदलीचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची अधिकृत  वेबसाईट व्यवस्थित काम करत नाही. अर्ज भरताना हे पोर्टल बंद पडते. यामुळे मागील दोन दिवसांपासून मधुकर सावळे इंटरनेट कॅफेवर रात्री उशिरापर्यंत जागरण करत होते. तसेच  आपली बदली कोठे होणार याची भीती सतत त्यांच्या मनात असल्याने ते मानसिक तणावात होते.
अस्वस्थता जाणवू लागली आणि चक्कर येत असल्याने त्यांना कळंब जि. उस्मानाबाद येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना पुढील  उपचारासाठी बार्शी येथे हलविण्यात येत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. कळंब येथील सार्वज निक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.